⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

‘त्या’ वृद्ध महिलेने‎ अखेर सहाव्या दिवशी सोडले उपोषण‎

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२२ । पाचोरा‎ तालुक्यातील सांगवी प्रलो येथील ‎मागासवर्गीय वृद्ध महिलेने भोगवटा ‎ ‎ असलेल्या जागेवर ग्रामस्थांनी ‎अतिक्रमण केल्याने ग्रामपंचायतीने ‎अतिक्रमण काढून द्यावे, या‎ मागणीसाठी येथील तहसील ‎ ‎ कार्यालयासमोर २२ फेब्रुवारीपासून ‎आमरण उपोषण सुरू केले होते.‎ अखेर सहाव्या दिवशी‎ अधिकाऱ्यांनी रविवारी सायंकाळी तासभर चर्चा करून‎ महिलेचे मन वळवले तसेच उपोषण‎ सोडवण्यात आले.

तहसीलदार कैलास चावडे,‎ पोलिस निरीक्षक किसनराव पाटील, निवासी नायब तहसीलदार‎ संभाजी पाटील, ग्रामपंचायत‎ विभागाचे विस्तार अधिकारी दिलीप‎ सुरवाडे यांनी उपोषण सोडण्याबाबत‎ पोलिस निरीक्षक कार्यालयात‎ रविवारी सकाळी तासभर बैठक घेत‎ उपोषण सोडण्याबाबत मार्ग काढला.‎ त्यानंतर सायंकाळी ५ वाजता‎ तहसीलदार कैलास चावडे यांच्या‎ हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण‎ सोडवण्यात आले.

दरम्यान, सांगवी‎ येथील वृद्ध महिलेच्या भोगवटा‎ असलेल्या जागेवर गावातील काही‎ लोकांनी अतिक्रमण केले आहे. ते‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎अतिक्रमण काढण्यासाठी महिलेने‎ २२ तारखेपासून तहसील‎ कार्यालयासमोर आमरण उपोषणाचे‎ हत्यार उपसले होते. गटविकास‎ अधिकारी अतुल पाटील, विस्तार‎ अधिकारी दिलीप सुरवाडे यांनी‎ स्वतः महिलेची दोन वेळा समजूत‎ काढण्याचा प्रयत्न केला. सहाय्यक‎ गटविकास अधिकारी पवार व‎ विस्तार अधिकारी दिलीप सुरवाडे‎ यांनी गावी जावून अतिक्रमण‎ काढण्यासाठी प्रयत्न केला.

मात्र,‎ तेथील नागरिक गोंधळ घालत‎ असल्याने ते माघारी फिरले.‎ उपोषणकर्ती महिला उपोषण सुरू‎ केल्यापासून अन्नपाण्याला शिवत‎ नसल्याने चौथ्या दिवशी त्यांची‎ प्रकृती खालावली होती. यामुळे‎ प्रशासनाला खडबडून जागे व्हावे‎ लागले. अखेर सहाव्या दिवशी‎ अधिकाऱ्यांनी तासभर चर्चा करून‎ महिलेचे मन वळवले व तहसीलदार‎ कैलास चावडे यांनी आगामी ४ ते ५‎ दिवसांत स्वतः सांगवीत येवून‎ जागेची पाहणी केल्यानंतर निर्णय‎ घेणार असल्याचे सांगितले. त्यानंतर‎ सांगवी येथील त्या महिलेने उपोषण‎ मागे घेतले आहे.‎