आमच्यामुळे सुषमा अंधारेंना ओळख : त्याचं जळगावात स्वागत

जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२२ । आम्ही महाष्ट्रात उठाव केला यामुळे अंधारेंना ओळख मिळाली आहे. सुषमा अंधारे यांना महाराष्ट्रात कुणीही ओळखत नव्हतं. मात्र मी त्यांच जळगावातील सभेसाठी मनापासून स्वागत करेन असं पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना ते असे हि म्हणाले कि, सुषमा अंधारे यांनी 40 बंडखोरांचे मनापासून आभार मानले पाहिजे. मागच्या तीन महिन्यांपूर्वी सुषमाताई अंधारे कुठे आहेत, हे अंधारात सुद्धा दिसत नव्हतं… अशा प्रकारची परिस्थिती अंधारे ताईंची होती. आज आम्ही बंड केल्यामुळे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्रात अंधारे ताई कोण आहेत, हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती पडतंय. त्यामुळे सुषमा ताईंनी आमचे आभार मानले पाहिजे, की आम्ही जर बंड केलं नसतं, तर महाराष्ट्राच्या जनतेने अजूनही अंधारे ताईंना ओळखलं नसतं.