ठाणे महानरपालिकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 1773 जागांवर भरती, भरघोस पगार मिळेल..

ऑगस्ट 11, 2025 3:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरी मिळण्यासाठी झटपणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. ठाणे महानगरपालिकेत गट क आणि गट ड पदांसाठी मोठी पदभरती जाहीर करण्यात आलीय. ही भरती सरळसेवा प्रवेशाने होणार आहे. दहावी ते पदवीधर तरुणांना नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी असणार आहे. या भरतीद्वारे १७७३ रिक्त पदे भरली जाणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Thane Mahanagarpalika Bharti 2025

thane mahanagarpalika bharti

या भरतीसाठी उद्या म्हणजेच १२ ऑगस्ट २०२५ पासून अर्जप्रक्रिया सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर २०२५ आहे. या नोकरीसाठी अर्ज तुम्ही www.thanecity.gov.in या वेबसाइटवर जाऊन करु शकतात. Thane Mahanagarpalika Recruitment 2025

या पदांसाठी होणार भरती?
सहायक परवाना निरीक्षक, टंकलेखक, लिपीक लेखा, अभियंता, प्रदूषण निरीक्षक, सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी, चालक, फायरमन, उपचार तज्ञ, मानसोपचार तज्ञ, परिचारिका, बायोमेडिकल इंजिनियर, फिजियोथेरेपिस्ट. फिजिसिस्ट, सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ज्युनिअर टेक्निशियन अशा विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

परीक्षा शुल्क :
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अमागास प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये शुल्क भरावे लागेल. व मागास प्रवर्ग व अनाथ यांना 900 शुल्क भरावे लागेल. तर माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिक उमेदवारांसाठी अर्ज शुल्क पूर्णतः माफ असणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now