महाराष्ट्र

मोठी बातमी ! TET प्रकरणाचे लोण थेट ‘या’ नेत्यापर्यंत, दोन्ही मुलींचे प्रमाणपत्र रद्द

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२२ । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (टीईटी) घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अनेकांना अटक करण्यात आलेली आहे. तर काही जणांची चौकशी सुरु आहे. दरम्यान, अशातच आता टीईटी घोटाळा (TET Scam) प्रकरणाचे लोण थेट सिल्लोडपर्यंत पोहोचलं आहे. परीक्षा परिषदेकडून जी यादी जाहीर करण्यात आली त्यामधील सर्व अपात्र असणाऱ्या लोकांनी पात्र होण्यासाठी सुपे यांना पैसे दिले होते. मात्र सुपे यांच्याकडून अपात्र उमेदवारांना पात्र असण्याचे सर्टिफिकेट मिळाले नाहीत. यात आमदार आणि माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींचाही समावेश आहे.

हीना आणि उजमा या दोन्ही शिक्षिका अब्दुल सत्तार यांच्या मुली असून 2020 मध्ये त्या अपात्र आहेत. सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी जी यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये या दोघींच्या नावांचा समावेश आहे. उजमा आणि हिना यांनी कुठल्या एजंटला पैसे दिले हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी अब्दुल सत्तार इच्छूक आहेत. मात्र, आता टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे त्यांच्यापर्यंत पोहोचल्याने त्यांना राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. हे प्रकरण वाढल्यास अब्दुल सत्तार यांची मंत्रिपदाची संधीही हुकण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button