⁠ 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटीलांचा पुन्हा विजय ; विरोधकांना चारली धूळ

जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटीलांचा पुन्हा विजय ; विरोधकांना चारली धूळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२४ । जळगाव ग्रामीण मतदार संघात शिवसेना महायुतीचे उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा विजय मिळविला आहे. त्यांनी महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना पराभवाची धूळ चारली. गुलाबराव पाटील जवळपास ६० हजार मतांनी विजयी झाले.

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री गुलाबराव पाटील महायुतीचे उमेदवार म्हणून ते रिंगणात उतरले होते. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी मंत्री गुलाबराव देवकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले. सोबतीला मनसेने पक्षाचे जिल्हाप्रमुख मुकुंदा रोटे यांना उमेदवारी दिली.

प्रचाराच्या दरम्यान, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मोठी चुरस पहायला मिळाली. दोन्ही बाजूंनी हिरीरीने प्रचार केल्यामुळे येथील लढत ही अतिशय चुरशीची झाली. निवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर कडाडून टिका करतांनाच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. गुलाबराव देवकरांसाठी शरद पवार व एकनाथराव खडसे यांनी तर गुलाबराव पाटलांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतल्या.

दरम्यान बुधवारी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यांनतर आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील हे पुन्हा विजयी झाले. जवळपास ६० हजार मतांनी विजयी झाले असून गुलाबराव देवकर यांचा त्यांनी पराभव केला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.