⁠ 
बुधवार, मे 8, 2024

चाळीसगावात अग्निविरांची भयंकर लूट!

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । भारतीय सैन्य दलातर्फे सैनिक होऊ इच्छिणाऱ्या तरुण मुलांसाठी अग्निपथ योजनेतंर्गत भरती प्रक्रिया सुरू आहे. यात काही उमेदवारांचे प्रवेश पत्र देखील आलेले आहेत. मात्र, चाळीसगावात या बेरोजगार तरुणांच्या टाळूवरचे लोणी काढण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, अग्निविरांकडून याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

शहरातील सायबर कॅफे चालक अग्निविरांच्या प्रवेश पत्रासाठी भरमसाठ फी आकारत आहेत. म्हणजे दहा रु. प्रिंटसाठी ५० रु. घेत आहेत तसेच नोटरी करण्यासाठी वकील देखील जास्त फीस घेत आहे. वीस रुपयाचे तिकीट सुद्धा जास्त पैसे घेऊन दिले जात असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आधीच बेरोजगारीच्या कचाट्यात सापडलेल्या तरुणांच्या माथी अधिक खर्चाचा भार पडत आहे.

दरम्यान, असंख्य अग्निविरांनी जळगाव लाईव्ह’च्या’ प्रतिनिधीशी बोलताना त्यांच्या व्यथा मांडल्या आहे. तसेच चाळीसगावात कशाप्रकारे आमची लूट होत आहे, कशाप्रकारे मनमानी कारभार चालू आहे, ही सर्व आपबीती त्यांनी सांगितली.