भुसावळ
भुसावळात टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी
Bhusawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२२ । महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची सातवी सीनियर व सहावी 14 वर्षातील (जुनियर) गटातील मुले/ मुलींची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा परभणी येथे 6 ते 8 नोव्हेंबर 2022 दरम्यान होत आहे़ या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंची निवड चाचणी रविवार, 23 रोजी नाहाटा महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी 10:30 भुसावळ येथे होत आहे.
सीनियर गटासाठी वयाची अट नाही तसेच 14 वर्षाआतील ज्युनिअर गटासाठी 1 जानेवारी 2008 नंतर जन्मलेल्या खेळाडूंनी वयाच्या छायांकित दाखल्यासह क्रिकेटच्या गणवेशात स्वतःची बॅट घेऊन निवड चाचणीस उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव वासेफ पटेल मो.9673171786 यांच्याशी संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.