⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार चौधरींची याचिका खंडपीठाने फेटाळली

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२१ । जिल्हा बँक निवडणुकीत उमेदवारी अर्ज फेटाळल्यानंतर माजी आमदार संतोष चौधरी यांनी नाशिक विभागीय सहनिबंधकांकडे धाव घेतली होती. तेथूनही दिलासा न मिळाल्याने त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र, खंडपीठाने ही याचिका फेटाळली.

चौधरी यांनी भुसावळ तालुका विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व संयुक्त शेती संस्था या मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, दोन वर्षांपेक्षा अधिक काळ शिक्षा भोगल्यामुळे त्यांचा अर्ज छाननीत नामंजूर झाला. यामुळे चौधरींनी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग यांच्याकडे अपील दाखल केले होते. ते फेटाळल्याने चौधरींनी खंडपीठात धाव घेतली. मात्र, खंडपीठाकडूनही त्यांना दिलासा मिळाला नाही.

कर्मवीर तुलसीराम औताडे विरूद्ध राज्य निवडणूक आयोग २०२१(२) या केसचा आधार देत तांत्रिक मुद्द्यावर गुणवत्तेच्या आधारावर मेंटेनेबल नाही, असे स्पष्ट करत भविष्यात इलेक्शन पीटिशन करु शकतात, असे निर्देश देत याचिका फेटाळली.