रासायनिक खत टाकताना दहा मजुरांना विषबाधा; जामनेर तालुक्यातील घटना

जुलै 10, 2024 2:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२४ । शेतात मक्याला रासायनिक खत टाकत असताना १० मजुरांना विषबाधा झाल्याची घटना जामनेर तालुक्यातील वाकोद येथे घडली. या मजुरांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Poisoning of laborers jpg webp

याबाबत असे की, जामनेर तालुक्यातील वाकोद येथील शेतमजूर महिला या मंगळवारी ९ जुलै रोजी वाकोद शिवारातील शेतात मकाच्या पिकाला रासायनिक खत देण्यासाठी गेलेल्या होत्या. त्यावेळी दुपारी ३ वाजता या रासायनिक खतामुळे त्यांना शरीरातील विषबाधा झाली. त्यामुळे सर्व मजूर महिला यांना अस्वस्थ वाटू लागले.

यांना झाला विषबाधा :
यात द्वारकाबाई अशोक जोशी वय-३२, पूजा विजय जोशी वय -२९, ज्योती विकास जोशी वय-२८, लताबाई मेघराज जोशी वय ६५, उषा संतोष जोशी वय- ३०, गुंताबाई उत्तम जोशी वय-२२, मंगलाबाई शिवाजी जोशी वय-४० उर्मिला शिवाजी जोशी वय-२०, माधुरी शिवाजी जोशी वय-१४ आणि छाया गजानन जोशी वय-४० यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांची रुग्णालयातून सुटका करण्यात आली. या घटनेत सर्व मजूर महिलांची प्रकृती स्थिर आहे. याबाबत पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now