⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब, जळगावात तापमानाचा पारा वाढला

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ । पावसाने उसंत घेतल्यानंतर जळगाव जिल्ह्यात थंडीची चाहूल पडली होती. मात्र, सध्या ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली असून दिवसा उन्हाचा चटका काहीसा वाढला आहे. कमाल तापमानात वाढ होऊन पारा ३५.२ अंश सेल्सिअसवर गेला आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या महिन्यात पावसाने उसंती घेतली होती. त्यानंतर थंडीची चाहूल पडू लागली होती. दिवाळीनंर गेले काही दिवस सकाळी व रात्रीच्या थंडीची हुडहुडी वाढली होती. दुपारच्या तापमानात काहीशी घट झाली होती. परंतु सोमवारी ढगाळ वातावरणामुळे दुपारी उकाडा जाणवत होता. कमाल तापमानात वाढ होऊन पारा ३५.२ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. त्यामुळे थंडीची तीव्रता देखील कमी झालेली आहे. गेल्या दोन दिवसांत कमाल तापमान ३३ अंशांवरून ३५ अंशांवर गेले आहे.

सोमवारी कमाल तापमान ३५.२ अंशांवर असताना किमान तापमान १५ अंश सेल्सिअसवर होते. या आठवड्यात पुन्हा तापमान वाढले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरुवारी ढगाळ वातावरण निवळून पुन्हा तापमानात घट होऊ शकते.