जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । यंदाच्या उन्हाळ्यात मागील काही दिवसापूर्वी राज्यातील सर्वाधिक ४७ हुन अधिक तापमान नोंदविल्या गेलेल्या भुसावळात काल ४१.१ अंश इतके तापमान नोंदविले गेले. गेल्या सहा दिवसांत भुसावळ शहराचे तापमान ३.३ अंशाने घसरून ४१.१ अंशांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे मे महिन्यात यंदाच्या सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाल्याने भुसावळकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. तर काल जळगावचा पारा वाढलेला दिसून आला. साेमवारी ४१ अंशांवर असलेला पारा मंगळवारी ४३.४ अंशांवर हाेता. दरम्यान, येत्या काही दिवसांत तापमानात हळूहळू घसरण हाेण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
मान्सूनच्या आगमनापूर्वीच राज्यातील अनेक भागात पूर्वमाेसमी पावसाचे संकेत असलेल्या आणि ढगांनी गर्दी केल्यामुळे तापमानाचा पारा घसरला आहे. तर काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तापमानात घट झाली आहे. काही दिवसापूर्वी राज्यातील सार्वधिक तापमान असलेल्या भुसावळातील तापमानात देखील घसरण झाली आहे. २४ मे रोजी शहराचे कमाल तापमान ४१.१, तर किमान तापमान २८ अंशांवर खाली आले. यंदाच्या मे महिन्यातील हे सर्वाधिक कमी कमाल तापमान आहे. त्यात अजून घट होण्याची चिन्हे आहेत. यामुळे भुसावळकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळतोय.
आज सकाळी १० वाजेपर्यंत ३५ अंशावर होते. त्यानंतर दुपारी १२ नंतर ३६ वर गेले होते. दरम्यान, आज तापमान ४० अंशाखाली राहणार असल्याचे दिसून येतेय. यामुळे उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार.
जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?
वेळ – अंश
११ वाजेला – ३५ अंश
१२ वाजेला – ३६ अंश
१ वाजेला- ३७ अंशापुढे
२ वाजेला – ३८ अंश
३ वाजेला – ३९ अंशापुढे
४ वाजेला – ४० अंश
५ वाजेला – ३९ अंश
६ वाजेला – ३९ अंश
७ वाजेला – ३७ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३७ तर रात्री ९ वाजेला ३६ अंशावर स्थिरावणार.