जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२५ । राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला असून यामुळे उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत आहेत. खान्देशात उष्णतेची लाट आल्याने गेल्या तीन दिवसांपासून जळगाव शहरात तापमान उच्चांक गाठत आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होताना दिसत आहे. दरम्यान आज जळगावचा पारा ४४ जाणार असल्याचा अंदाज आहे.

आयएमडीनुसार मंगळवारी ४३.३ अंश तर बुधवारी ४३.७ अंशाची नोंद झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी तापमान वाढून गुरूवारी पारा ४४ अंशांवर जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक यांनी दिली. दरम्यान सकाळपासूनच उन्हाचा चटका बसत आहे. सायंकाळपर्यंत उन्हाच्या झळा बसत असल्याने नागरिक हैराण झाले. दरम्यान उन्हाळ्याचे आणखी दोन महिने शिल्लक असल्याने मे महिन्यात तापमान यापेक्षा अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आज गुरूवारी शहराचे हवामान उष्ण आणि खूपच दमट राहिल. कमी प्रमाणात ढग असल्यामुळे सूर्यप्रकाश थोडा हैझी (घुसर) असेल. जिल्ह्यात एक मजबूत उच्च दाबाचे क्षेत्र प्रभावी असेल. त्यामुळे तापमान उच्च राहण्याची शक्यता आहे. उच्च दाबामुळे थेट सूर्यप्रकाश येईल आणि कमाल तापमान अंदाजे ४४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार आहे. तसेच उत्तर-पश्चिमेकडून हलका व कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे काही प्रमाणात थंड आणि हलकी हवा प्रवेश करेल. रात्री व पहाटे शीतलता जाणवेल; परंतु वाऱ्याची गती फार जास्त नसेल.