जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२५ । जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) बोदवड तहसील कार्यालयातमधून एक महत्वाची बातमी समोर आलीय. मालेगावचे (Malegaon) तत्कालीन व बोदवडचे (Bodwad) विद्यमान तहसीलदार (Tahsildar) नितीनकुमार देवरे (Nitinkumar Devre) यांना निलंबित करण्यात आले. याबाबतचे आदेश राज्याचे सहसचिव अजित देशमुख (Ajit Deshmukh) यांनी काढले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे. दरम्यान, मालेगावात कर्तव्यावर असताना बांग्लादेशी रोहिंग्यांना (Bangladeshi Rohingyas) जन्म दाखला दिल्याचा ठपका ठेवत शासनाने ही कारवाई केली आहे. Tehsildar of Bodwad suspended

नेमकं प्रकरण काय?
बांगलादेशी रोहिंग्यांना मालेगावात जन्म दाखले देण्यात आल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी केली होती. नितीनकुमार देवरे हे मालेगावचे तहसीलदार असताना त्यांनी शासन निर्देशांनुसार काम न करता आणि शासकीय कामकाजात पुरेशे गांभीर्य न दर्शविता बांगलादेशी रोहिंग्यांना जन्मदाखले देऊन त्यांना आधारकार्ड देण्यात आल्यामुळे त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप आहे. शासनाने किरीट सोमय्या यांच्या तक्रारीची दखल घेऊन या प्रकरणी मालेगावचे तत्कालीन तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्यासह नायब तहसीलदार संदीप धरणकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
या कारवाईमुळे ते तत्काळ प्रभावाने पुढील आदेश होईपर्यंत शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहेत. निलंबन कालावधीत त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व संमतीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. दरम्यान,