⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 9, 2024
Home | सरकारी योजना | सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत ४८०० लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत ४८०० लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२३ । सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे २०२३-२४ हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने चर्मकार समाजातील (चांभार, मोची, ढोर व होलार) व्यक्तींना समाजप्रवाहात मानाचे स्थान मिळावे. त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासासाठी केंद्र व राज्यशासनाच्या विविध शासकिय योजना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयांमार्फत राबविल्या जाणार आहेत. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ४८०० लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (मुंबई) धम्मज्योती गजभिये यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

महामंडळाची स्थापना १ मे १९७४ रोजी झाली. महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नवी दिल्ली येथील एन.एस.एफ.डी.सी.च्या मुदती कर्ज योजने अंतर्गत स्मॉल बिझनेससाठी १ लाख रूपये, दीड लाख रूपये व २ लाख‌ रूपये, चर्मोद्योग २ लाख रूपये, लघुऋण वित्त योजना व महिला समृद्धी योजनेसाठी प्रत्येकी ५० हजार रूपये देण्यात येणार आहेत. या योजना व मागील प्रलंबित प्रकरणांकरिता २२ कोटी २१ लाखांचा निधी महामंडळाला प्राप्त झालेला आहे.

सन २०२३ २४ या आर्थिक वर्षात एन.एस.एफ.डी.सीच्या मुदती कर्ज योजने अंतर्गत स्मॉल बिझनेससाठी ५ लाख रुपये, लघुऋण वित्त योजना व महिला समृद्धी योजना प्रत्येकी १ लाख ४० हजार रूपये तसेच नवीन महिला अधिकारिता योजनेकरीता रूपये ५ लाख मंजूर झालेले आहेत.

एन.एस.एफ.डी.सी च्या शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये वाढ झाली असून भारतामध्ये २० लाख रूपये व विदेशामध्ये ३० लाखापर्यंत कर्ज मंजूर करण्यात येईल. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन गजभिये यांनी केले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.