जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । प्रवासी शौचालयात गेल्याची संधी साधत चोरट्यांनी त्याच्या बॅगेतील सुमारे १४ हजार रुपये किमतीचा मोबाइल लंपास केला. ही घटना रविवारी पहाटे २ वाजता इटारसी-खंडवा दरम्यान सचखंड एक्स्प्रेसमध्ये घडली. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
भुसावळ शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी राेहीत सुशीलकुमार ललवाणी हे अमृतसर येथून भुसावळ येण्यासाठी सचखंड एक्स्प्रेसच्या एस-१ या डब्यातील ३९ क्रमांकाच्या सीटवर बसून प्रवास करत हाेते. इटारसी ते खंडवादरम्यान ते मोबाइल बॅगेत ठेऊन शाैचालयात गेले. परत आल्यावर बॅगेतील मोबाइल चोरीला गेल्याचे उघड झाले. त्यांनी भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली.