जळगाव जिल्हाजळगाव शहर

अत्याचार करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करा : मुस्लिम समाजाची मागणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । एका अल्पसंख्यांक १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची गर्भधारणा झाल्याबद्दल एमआयडीसी पोलीसांत एकाच पीडितेचे विविध दोन गुन्हे दाखल झाले असून, ‘त्या’ दोघी गुन्ह्यातील दोषी आरोपींना पोलिसांनी अटक केली, असून त्यापैकी एक आरोपी हा अल्पवयीन असल्याने (खान पुर्ण नाव लिहले नाही) त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. दुसरा आरोपी साबीर शेख जहुर, वय २६ याला पोलिस कोठडी मिळाली असून तो पोलीस कोठडीत आहे.

पोलीस अधीक्षकांना साकडे

जळगाव जिल्हा मुस्लिम मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख व महिला सुरक्षा समितीच्या सदस्या निवेदिता ताठे यांच्या नेतृत्वात जळगाव शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची सुटी असताना सुद्धा भेट घेऊन त्यांना साकडे घातले. त्यात अत्याचार प्रकरणात दहा दिवसाच्या आत न्यायालयात तपास पूर्ण करून दोन्ही गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल करावे, आरोपींचा जामीन होऊ शकणार नाही या पद्धतीने तपास करावा, संपूर्ण केस अंडर ट्रायल चालवून दोषींना शिक्षा होत नाही तोपर्यंत त्यांना जामीन मिळता कामा नये अशी व्यवस्था करावी व न्यायालयाला विनंती करून सदर प्रकरण ३० दिवसाच्या आत निकाली काढावे व दोषींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावे अशी एकमुखी मागणी करण्यात आली.

पोलिस अधिक्षकाचे आश्वासन

अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी शिष्टमंडळाला आश्वासित केले. की पोलीस विभाग हा शक्यतो अशा प्रकरणी दहा ते पंधरा दिवसात तपास पूर्ण करून दोषारोपपत्र सादर करतो. तसेच या दोन्ही गुन्ह्यात सुद्धा १० ते १२ दिवसात आमचा तपास पूर्ण करण्यात येईल व प्रकरण जलद न्यायालयात अथवा जलद गतीने होण्यासाठी पोलीस विभाग आवश्यक ती कारवाई करेल असे आश्वासन दिले.

यावेळी महिला सुरक्षा समितीच्या निवेदिता ताठे, मन्यार बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख, ह्युमन राईट कमिशनचे जिल्हाध्यक्ष अन्वर खान, मुस्लिम इदगाह ट्रस्टचे अनिस शहा, जामा मस्जिद ट्रस्टचे सय्यद चांद, इस्लामपुरा चे समाजसेवक सय्यद शाहिद, शिकलगर बिरादरीचे मुजाहिद खान व जावेद खान, मानियार बिरादरीचे एडवोकेट आमीर शेख, रफिक शेख वायरमन, शेख सलीम, मोहसिन शेख आदी उपस्थिती होते.

Related Articles

Back to top button