भुसावळ

भुसावळात रविवारी ‘नेवे-वाणी समाज मंडळा’तर्फे बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे रणशिंग!

16 शहरांतील संघांचा सहभाग; तब्बल ३१ सामन्यांचा थरार;
पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर रंगणार स्पर्धा

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ येथील नेवे-वाणी समाज मंडळाच्या वतीने रविवार, दिनांक १४ जून २०२६ रोजी भव्य ‘बॉक्स क्रिकेट स्पर्धा-२०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. यावल रोडवरील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर सकाळी ६:०० वाजेपासून या क्रीडा महोत्सवाला सुरुवात होईल.समाजातील युवा खेळाडूंच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि सर्व समाजबांधव एकत्र यावेत, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

cricket

सकाळी ६ वाजता शानदार उद्घाटन

रविवार, दि. १४ जून रोजी सकाळी ठीक ६:०० वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे शानदार उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेत एकूण ३१ सामने खेळवले जाणार असून, संपूर्ण दिवसभर क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे. रात्री ८:०० वाजता बक्षीस वितरण समारंभाने या स्पर्धेचा समारोप होईल.

विविध शहरांतून संघांची नोंदणी

या स्पर्धेला राज्य आणि राज्याबाहेरून देखील मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील शहरांतून संघ दाखल झाले आहेत:

महाराष्ट्र: भुसावळ, जळगाव, साकळी, यवतमाळ, पुणे, रिंगणगाव, चुंचाळे, यावल आणि मुंबई.

इतर राज्ये: बऱ्हाणपूर (म.प्र.) आणि सुरत (गुजरात).

समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन
“या क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण समाज एकत्र येत आहे. तरी भुसावळ व परिसरातील सर्व समाजबांधवांनी सहकुटुंब, सहपरिवार दिवसभर उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा,” असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

आवाहनकर्ते:
किशोर गजानन नेवे (अध्यक्ष)
दिपक हरिभाऊ नेवे (उपाध्यक्ष)
राम सुधाकर माहूरकर (सचिव)
विनीता सुनिल नेवे (अध्यक्षा, महिला मंडळ)
अंजली प्रशांत नेवे (उपाध्यक्ष, महिला मंडळ)
पुजा उदय नेवे (सचिव, महिला मंडळ)
समस्त नेवे-वाणी समाज मंडळ, भुसावळ.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button