शनिपेठ पोलिसांनी पकडले अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । शहरातील कालिंका माता मंदिराजवळून भरधाव जात असलेले अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर गुरुवारी रात्री गस्तीवर असलेल्या शनिपेठ पोलिसांनी चालकासह डंपर ताब्यात घेतले आहे.
गिरणा नदीपात्रातून रात्री ११ वाजेनंतर अवैधरित्या वाळू उपसा करुन वाहतूक करण्यात येत आहे. नदीपात्रातून अवैध उपसा करुन वाळू वाहतूक करीत असलेले एमएच-१९, झेड-४८४७ या क्रमांकाचे समोरुन महाकाल व लावा ताकद असा मजकूर लिहिलेले डंपर रात्र गस्तीच्या पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी चालकासह डंपर ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणले. या कारवाईबाबतचा अहवाल तहसील कार्यालयाला सादर करण्यात येणार आहे. त्या अवैध वाळूच्या डंपर मालकाला नवीन वाळू धोरणानुसार आढळून आलेल्या अवैध वाळूसाठ्याच्या चारपट प्रमाणे तहसीलदारांकडून अडीच लाख रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, शहरात रात्रीच्यावेळी बिनधास्तपणे अवैध वाहतूक सुरू असून प्रशासन डाेळेझाक करीत आहे.
हे देखील वाचा :
- संतापजनक ! अल्पवयीन मुलीवर नात्यातील नराधमाचा अत्याचार; पीडित मुलगी गर्भवती
- एरंडोलमधील ३ कुख्यात गुन्हेगार जळगाव जिल्ह्यातून तडीपार
- सालदाराकडून वृद्ध मालकिणीचा बेल्टने गळा आवळून खून ; रावेरातील घटनेने खळबळ
- तरसोद-पाळधी बायपासवर पुन्हा भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू
- मावशीच्या घरावरच भाच्याचा डल्ला! रावेरातील घरफोडीचा छडा; दोघे जेरबंद



