जळगाव जिल्हा

आमदार राजुमामांना दाणा बाजार माथाडी हमाल कामगार सेनेचा जाहीर पाठिंबा

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील दाणा बाजार माथाडी हमाल व जनरल कामगार सेनेतर्फे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. तसेच मतदानाच्या दिवशी हमाली बंद राहील असे कळविण्यात आले आहे.

mathadi hamali kamgar

एका पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे की, दाणा बाजारातील माथाडी हमाल कामगार, हातगाडी कामगार, दुकानातील कामगारांचा आ. राजूमामा भोळे यांना जाहीर पाठिंबा आहे. मतदानाच्या दिवशी मतदान करता यावे यासाठी हमाली कामकाज बंद राहील.

तसेच शहरातील इतर संघटनेतील हमाली कामगारांनी देखील आपले कामकाज बंद ठेवून मतदानाचे कर्तव्य बजवावे असे पत्रात म्हटले आहे. मतदान करणे हा राष्ट्रीय अधिकार असून प्रत्येक हमाल बांधवाने आपल्या कुटुंबीयांसह मतदान करावे असे आवाहन देखील अध्यक्ष शेषराव वलकर यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button