⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

दिल्ली येथील चित्र प्रदर्शनात‎ चोपडाच्या शिक्षकाला मिळाला पुरस्कार‎

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२२ । दिल्ली येथे आयोजित इंद्रधनुष्य आर्ट वर्ड गॅलरीच्या‎ ऑनलाइन या चित्र प्रदर्शनातील स्पर्धेचा २५ मार्चला निकाल जाहीर‎ झाला. यात चोपड्याचे कला शिक्षक शकील अहमद शेख अय्युब‎ यांच्या लव्ह राधा-कृष्ण या चित्राला द माईकल एजेलो पुरस्कार‎ मिळाला आहे. या प्रदर्शनात संपूर्ण देशातून जवळपास ३००‎ नामवंत चित्रकारांनी सहभाग घेतला होता. यात विविध राज्यातील‎ सहभागी नामवंत चित्रकारांच्या उत्तम चित्रांची निवड झाली आहे.‎

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, उपाध्यक्षा आशा‎ पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील, प्राचार्य ममता न्याती, उपप्राचार्य‎ परमेश्वरी राजकुमार यांच्यासह ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम‎ स्कूलचे सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्यांचे काैतुक केले आहे.‎ चोपडा चित्रकला महाविद्यालयाचे प्रिन्सिपल राजेंद्र महाजन यांचे‎ त्यांना मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शकील अहमद शेख अय्युब‎ यांचे सर्वत्र काैतुक हाेत आहेे.‎