जळगाव जिल्हागुन्हे

महिला पोलीसची बदनामी करणारा निघाला पोलीसच!

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२१ । शहरातील पोलीस मुख्यालयात असलेल्या महिला कर्मचारीच्या नावे काही दिवसांपूर्वी पोलीस आणि पत्रकारांना अश्लील मेसेज पाठविण्यात आले होते. सायबर शाखेत याप्रकरणी दाखल असलेल्या तक्रारीवरून तपासाअंती पोलिसांनी मुख्यालयातच कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

the one who defamed women police is the police

पोलिस मुख्यालयातील महिला कर्मचारीच्या नावे काही दिवसांपूर्वी मुख्यालयातील पोलीस अधिकारी, कर्मचारी व काही पत्रकारांना अश्लील मेसेज पाठविण्यात आले होते. याप्रकरणी संबंधित महिलेने सायबर शाखेत तक्रार दाखल केली होती. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी याप्रकरणी तपासाच्या सूचना केल्यानंतर संबंधित व्यक्तीचे लोकेशन नाशिक मिळून आले होते.
सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे यांच्या पथकाने मेसेज केलेल्या मोबाईलचे लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या नरेंद्र लोटन पाटील (वारुळे) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस मुख्यालयात वर्षानुवर्षे असलेला कर्मचारी
नरेंद्र पाटील हे पोलीस मुख्यालयात अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. पोलीस मुख्यालयातील काही तांत्रिक शाखा, वाचक शाखा आणि स्थानिक गुन्हे शाखेशी निगडित असलेल्या शाखांमध्ये काही कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. बदलीच्या वेळी तात्पुरती एखाद्या पोलीस ठाण्यात बदली दाखवून त्यांना पुन्हा पोलीस मुख्यालयातील शाखेत संलग्नित केले जाते. या शाखेतील काही कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सलगी करून त्यांची मर्जी जिंकून घेतात. जिल्हाभरातील पोलीस ठाणे आणि कर्मचाऱ्यांबद्दल ते अधिकाऱ्यांना माहिती पुरवीत असल्याने अधिकारी देखील त्यांना पाठीशी घालत त्याच ठिकाणी नेमणूक देत असतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button