नोकरी संधी

ISRO मध्ये पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध पदांसाठी मेगा भरती, त्वरित करा अर्ज!

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इस्रोने विविध पदांसाठी एकूण 336 रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे.यासाठी पात्र उमेदवारांना इस्रोच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम दिनांक 16 ऑगस्ट 2026 पर्यंत आहे.

isro

कोणती पदे भरली जाणार?

असिस्टंट – 113 पदे
ज्युनियर पर्सनल असिस्टंट – 81 पदे
उच्च श्रेणी लिपिक (Upper Division Clerk) – 22 पदे
स्टेनोग्राफर – 10 पदे
असिस्टंट (स्वायत्त संस्थांमध्ये) – 17 पदे
ज्युनियर पर्सनल असिस्टंट (स्वायत्त संस्थांमध्ये) – 1 पद

शैक्षणिक पात्रता

असिस्टंट आणि उच्च श्रेणी लिपिक पदांसाठी किमान 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि संगणक वापराचे ज्ञान आवश्यक आहे.

ज्युनियर पर्सनल असिस्टंट व स्टेनोग्राफर पदांसाठी 60 टक्के गुणांसह पदवी किंवा कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील 60 टक्के गुणांसह डिप्लोमा, स्टेनो-टायपिस्ट/स्टेनोग्राफर म्हणून एक वर्षाचा अनुभव, इंग्रजी स्टेनोग्राफीचा 60 शब्द प्रति मिनिट वेग तसेच संगणक वापराचे ज्ञान आवश्यक आहे.

वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 16 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षे असावे. सरकारी नियमानुसार वयात सवलत मिळेल
अर्ज शुल्क : ₹500

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button