वाणिज्य

Gold Silver : अक्षय तृतीयेपूर्वी सोन्या – चांदीचा भाव घसरला ; आताचे ताजे दर तपासून घ्या..

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२५ । गेल्या वर्षी अक्षय तृतीयेला सोन्याचा भाव 73 हजार रुपये प्रति तोळा इतका होता. यावेळी अक्षय तृतीयेपूर्वीच सोन्याने 1 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आता अवघ्या चार दिवसांवर अक्षय्य तृतीया सण येऊन ठेपला आहे. मात्र त्यापूर्वी ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सोने आणि चांदी दरात घसरण झाली आहे. तरी पण सध्या दोन्ही धातूंचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. आजचे दर जाणून घ्या..

gold silver 1 jpg webp

गुडरिटर्न्स या वेबसाइटनुसार, आज २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा ९८,२१० रुपये आहे. आज सोन्याच्या भावात फक्त ३० रुपयांनी घसरण झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७८,५८६ रुपये आहे. आज २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ९०,०२० रुपये आहे. यामध्येही ३० रुपयांनी घसरण झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७२,०१६ रुपये आहे.१८ ग्रॅम सोने प्रति तोळा ७३,६६० रुपये आहे. या किंमतीत २० रुपयांची घसरण झाली आहे. तर ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५८,९२८ रुपये आहे.

चांदीच्या किंमतीत गेल्या अनेक दिवसांपासून कोणताही बदल झालेला नाही. ८ ग्रॅम चांदीची किंमत ८०७ रुपये आहे. १० ग्रॅम चांदीची किंमत १००९ रुपये आहे. १०० ग्रॅम चांदीची किंमत १०,०९० रुपये आहे.

जळगावातील सोने चांदीचा दर?
दरम्यान, काल शुक्रवारी सोने दरात ८०० रुपयांची घसरण झाली. यामुळे जळगाव सराफ बाजारात आता २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर विनाजीएसटी ९६००० रुपये इतका आहे. तर चांदीचा दर १००० रुपयांनी घसरून ९८ हजारांवर आली आहे. दरम्यान, पुढील आठ दिवस सोने व चांदीच्या दरातील ही चढ-उतार सुरू राहिल असा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button