⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

काँग्रेसतर्फे अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२२ । केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात जळगाव जिल्ह्याभरात काँग्रेसकमिटीतर्फे व जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष व महानगरअध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा बाजी देऊन धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारींना निवेदन देण्यात आले.

मोदी सरकारच्या काळात वर्षाला दोन कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकार गेल्या पन्नास वर्षातील सगळ्यात जास्त बेरोजगारी आहे . मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक वेळा भारतामध्ये आर्थिक संकट निर्माण झाले होते परंतु मोदी सरकारने इथवरच न थांबता ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षाखाली असलेल्या युवकांची लोकसंख्या आहे. तरी देखील मोदी सरकारने बेरोजगारी यापेक्षा धर्म व धर्माधारित द्वेष या विषयांना जास्त महत्त्व दिले आहे.


२०२४ या निवडणुकीला केवळ दोन वर्षे उरली असल्याने रोजगार निर्मितीसाठी आपण प्रयत्न करत आहोत हे दाखवण्याकरिता मोदी सरकारने नुकतेच दोन महत्त्वाचे निर्णय जाहीर केले यात एक म्हणजे पुढील दीड वर्षांमध्ये दहा लाख सरकारी पदे भरण्याचा व दुसरा म्हणजे सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये अग्नीपथ योजनेच्या माध्यमातून प्रतिवर्षी ४६ हजार पदे भरण्याची ही अग्निपथ योजना आहे. म्हणजेच ही अग्निपथ योजना रोगापेक्षा इलाजच भयंकर असु शकते अशी ठरते ही योजना विवादास्पद असून प्रचंड मोठ्या जोखमीचे आहे.तसेच वर्षानुवर्षांपासून सैन्यदलातील परंपरा छेद देणारी ही योजना आहे निवृत्त लक्ष अधिकाऱ्यांनी देखील या योजनेचा तीव्र विरोध केला आहे.

अग्निपथ या योजनेला “टूर ऑफ ड्यूटी” योजनादेखील म्हटल्या गेलेल्या या योजनेअंतर्गत किंवा चार वर्षाच्या काळासाठी तीनही सैन्यदलात प्रतिवर्षी ४६ हजार जवान नियुक्त केले जाणार आहे. म्हणजेच चार वर्षानंतर परत सैनिकांवरती बेरोजगार होण्याची वेळ या मोदी सरकार मुळे येणार आहे. त्याच पद्धतीने सैनिकांना ज्या काही केंद्र सरकारच्या सुविधा नोकरी नंतरही मिळत होत्या त्या देखील मोदी सरकारने रद्द केलेले आहेत. म्हणजेच सैन्यातील सर्व जवानांना नोकरी नंतरचा पेन्शन देखील मोदी सरकारने रद्द केलेले आहे. त्याच पद्धतीने निवृत्तीनंतर या सैन्य दलातील जवानांचे भवितव्य काय हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे.


देशातील वाढत्या या योजनेच्या विरोधातील असंतोष यामुळे केंद्र सरकारने नुकतेच या योजनेमध्ये थोडे तुटपुंजे असे बदल केलेले आहेत म्हणजेच ४६००० प्रतिवर्षी जवान भरती होतील त्यापैकी केवळ २५ टक्के जवानांना भरतीनंतर १५ वर्षांसाठी कायमस्वरूपी अशी नोकरी देण्याचा आता बदल त्यामध्ये केलेला आहे.
परंतु उरलेल्या ७५ टक्के जवानांचं भवितव्य अजूनही अंधारामध्ये आहे. अग्निपथ या योजनेमुळे चार वर्षाच्या नोकरीनंतर सैनिकांना पुन्हा रोजगार शोधण्याची वेळ मोदी सरकारच्या कृपेमुळे येणार आहे.


त्या अनुषंगाने च्या अग्नीपथ योजनेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने संपूर्ण भारत देशामध्ये त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्यात देखील अतिशय तीव्र प्रमाणात असा विरोध होत आहे त्या अनुषंगानेच आज जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगाव जिल्हा युवक काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज केंद्र सरकारच्या विरोधामध्ये निदर्शने करून अग्निपथ योजना तात्काळ मागे घ्यावी या पद्धतीची मागणी केंद्र सरकारकडे केली व निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्र सरकारकडे ही मागणी पाठवण्यात आली.

याप्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, युवक काँग्रेस महानगर अध्यक्ष मुजीब पटेल, सरचिटणीस प्रदीप सोनवणे, जगदीश गाढे, दीपक सोनवणे, सुधीर पाटील,विशाल पवार, सखाराम मोरे, अमजद पठाण, राहुल भालेराव, रवींद्र चौधरी,अनिल राठोड, सतीश चव्हाण,राजेश पवार, सागर चव्हाण,समाधान राठोड,आकाश नाईक, रवी नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते..