जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२२ । जळगाव शहरातील ममुराबाद नाका नजीक ३५ वर्षीय तरूणाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला. शेख गफ्फार शेख जब्बार (वय-३५) रा. उस्मानियॉ पार्क असे मयत तरूणाचे नाव असून तरूणाचा मृत्यू घातपाताने झाल्याचा संशय नातेवाईकांकडून व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू आहे.

याबाबत असे की, शहरातील उस्मानियॉ पार्क भागात शेख गफ्फार हे आईवडील, पत्नी, भाऊ व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. बांधकामाचे सेंटींग काम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. बुधवारी २६ जानेवारी रोजी सायंकाळी काम आटोपून घरी निघाले होते. परंतू ते रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता कोठेही आढळून आले नाही. गुरूवारी २७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ममुराबाद रोडवरील कोंबडी फार्मजवळ त्यांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला.

त्यांच्या डोक्यावर, हनुवटीवर मार लागल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. जळगाव तालुका पोलीस आणि नातेवाईकांनी धाव घेतली व मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. यावेळी जिल्हा रूग्णालयात नातेवाईक व मित्र परिवार यांनी मोठी गर्दी केली होती. तरूणाचा मृत्यू घातपाताने झाल्याचा संशयित नातेवाईकांकडून केले जात आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू आहे.
हे देखील वाचा :
- यावल-सावखेडा मार्गावर धोकादायक फांद्या छाटा व फलक लावा; ॲड. देवकांत पाटलांची PWD कडे मागणी
- जळगाव जिल्ह्यावासीयांसाठी खुशखबर! गिरणा धरणाची जलपातळी ८६ टक्क्यांवर पोहोचली!
- यावल आयटीआयमध्ये विविध पदांसाठी भरती; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याची संधी
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न
- महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी











