जळगाव जि.प.च्या ग्रामपंचात विभागातील कनिष्ठ सहायकावर निलंबनाची कारवाई ; प्रकरण काय?

नोव्हेंबर 7, 2025 10:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहायक अमजद खान असलम खान यांना सेवेत शिस्तभंग केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाईचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दि. ६ रोजी जारी केले आहेत.

zp jalgaon Minal Karanwal

सदर कर्मचारी वैद्यकीय देयकाचे कार्यासन सांभाळत असताना विभागीय आयुक्त यांच्या मान्यतेने शासनाकडे पाठविण्यात येणाऱ्या वैद्यकीय देयकावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचा आवश्यक अभिप्राय न घेता, थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेसाठी देयक सादर करण्यात आले. तसेच, कार्यासनाशी संबंधित कामकाज वेळेत पूर्ण न करणे व अपूर्ण ठेवणे अशा निष्काळजीपणामुळे प्रशासकीय प्रक्रियांचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिस्तभंग कारवाईचा भाग म्हणून तत्काळ निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हा परिषदेच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि शिस्त ही अनिवार्य आहे. कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचे जि.प. सीईओ मिनल करनवाल यांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now