गुन्हेजळगाव जिल्हा

बँक अपहार प्रकरणात संशयित आरोपीला चाळीसगावमधून ठोकल्या बेड्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२४ । मनमाड शहरातील युनियन बँके शाखेच्या अधिकृत प्रतिनिधीने बनावट शिक्के आणि सर्टिफिकेट देऊन गुंतवणुकदारांच्या 1 कोटीपेक्षा जास्त रक्कमेचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणातील संशयित आरोपीला मनमाड पोलिसांनी चाळीसगावातून अटक केली आहे. संदीप देशमुख असं संशयित आरोपीचे नाव असून हे घोटाळा प्रकरण समोर येताच तो फरार झाला होता. आता याप्रकरणात पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?
युनियन बँक मनमाड शाखेत दोन दिवसांपूर्वी बँकेच्या अधिकृत प्रतिनिधीने बनावट शिक्के व सर्टिफिकेट देऊन गुंतवणूकदारांचा १ कोटी ३९ लाख इतक्या रक्कमेचा अपहार केला आहे. बँकेत येणाऱ्या शाखा धारकांना विमा विक्री अधिकारी असल्याचे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्याकडून वेळोवेळी रक्कम वसूल केली. मात्र ती रक्कम त्यांच्या खात्यात न भरता या सगळ्या रकमेचा अपहार केला; अशी तक्रार बँकेच्या अधिकाऱ्याने दाखल केली. या प्रकरणी संदीप देशमुख विरोधात मनमाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बँकेत अपहार झाल्याच्या वृतामुळे खातदेरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे खातेदारांनी बँकेत पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी केली. हे घोटाळा प्रकरण समोर आल्यानंतर संदीप देशमुख हा संशयित आरोपी फरार झाला होता. त्याला शोधण्यासाठी मनमाड पोलिसांनी पथक तयार केले होते. पोलिसांच्या या पथकाला संशयित आरोपी संदीप देशमुखला अटक करण्यात यश आले.

चाळीसगावमधून संदीप देशमुखला अटक करण्यात आली आहे. त्याला मनमाडला आणले जाणार असून पोलिस त्याची कसून चौकशी करणार आहेत. या प्रकरणात आणखी कोण-कोण सहभागी आहेत का? या सर्व बाजूने तपास केला जाणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button