⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

आंतरराष्ट्रीय मानव अधिकार परिषदेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी सुरज नारखेडे

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२२ । आंतराष्ट्रीय मानवअधिकार परिषद महाराष्ट्र राज्याच्या युवा विभाग अध्यक्षपदी सुरज नारखेडे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड राष्ट्रीय युवा विभागाच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मुंबई येथे मुख्य कार्यालयात पार पडली यावेळी उपस्थित संदर्भीय राष्ट्रीय कार्यकारणी कमिटीच्या सर्व सदस्य तथा कार्यकारणी सचिव यांच्या उपस्थितीत सर्वानुमते त्यांची आंतराष्ट्रीय मानव अधिकार परिषदेच्या महाराष्ट्र राज्याच्या युवा विभाग अध्यक्षपदी नारखेडे यांची निवड करण्यात आली.

डॉ. सनी लक्ष्मीचंद शहा यांच्या सूचनेनुसार या परिषदेच्या राष्ट्रीय बोर्ड कार्यकारणी कमिटीने सर्वानुमते ठराव करीत आंतराष्ट्रीय मानव अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य युवा विभाग अध्यक्षपदी सुरज नारखेडे यांची निवड करण्यात आली. कार्यकारणी बोर्डने हा ठराव तर पारित केला, राष्ट्रीय बोर्डने नारखेडे यांच्याकडून महाराष्ट्रातील मानवाधिकार संदर्भातीत विविध घटनात्मक बाबींचा अभ्यास करून त्यासंदर्भात कार्य करण्याची आशा व्यक्त केली. सुरज नारखेडे यांचा कार्याचा अहवाल आणि त्यांची समाजिक विविध क्षेत्रातील कामगिरी पाहून प्रशासनावरील असलेती पकड व प्रत्येक क्षेत्रातीत प्रशासनाचा असलेला सखोल अभ्यास या बाबीचा आढावा घेऊन करण्यात आला.

या निवडीला सुमारे ६ महिन्याचा कालावधी घेऊन या निवडीबद्दत राष्ट्रीय बोर्ड कमिटीने सर्वानुमते ठराव करून निर्णय घेतला. निवडीनंतर नारखेडे यांना राष्ट्रीय बोर्ड कमेटीने दूरध्वनीव्दारे शुभेच्छा दिल्या मितव्दारे त्यांना निवडीबद्दलचे अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आले. येत्या जुलै महिन्यात असलेल्या राष्ट्रीय बोर्ड कमिटीच्या परिषदेस सुरज नारखेडे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. जबाबदारी मोठी आहे. परंतू मानवता हा धर्म जोपासत नेहमी मानवी हक्कासाठी लढा देण्यात येईल व मानव घटकाला न्याय देण्यासाठी राज्यातील सर्व क्षेत्रात शासकीय, निमशासकीय, खासगी अशा विविध ठिकाणी जेथे मानवी घटकाचा समावेश असेल त्या प्रत्येक ठिकाणी मानवाधिकार परिषद अध्यक्ष या नात्याने न्याय देण्याचा प्रयत्न करेल अशी ग्वाही आंतरराष्ट्रीय मानवअधिकार परिषदेचे राज्याचे युवा विभाग अध्यक्ष सुरज नारखेडे यांनी दिली.

शहरात कोरोनो काळात झालेला भष्टाचार बदल सिव्हिल, खाजगी हॉस्पिटल महानगरपालिकेत रस्ते, गटारी, अश्या विविध गोष्टीवर भष्टाचार, बालरोजगार, विद्यार्थीच्या कॉलेज मधल्या एल.सी.मार्कशीटच्या समस्या, विध्यार्थाना रोजगार उपलब्ध अश्या अनेक समस्यांचे निराकारण करून एक एक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.आंतराष्ट्रीय मानवअधिकार परिषद महाराष्ट्र राज्याच्या युवा विभाग अध्यक्षपदी सुरज नारखेडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.