⁠ 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे रोहिणी खडसे यांना पाठिंबा जाहिर

अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे रोहिणी खडसे यांना पाठिंबा जाहिर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे मुक्ताईनगर विधानसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार ॲड.रोहिणी एकनाथराव खडसे यांना जाहिर पाठिंबा देण्यात आला असून, बोदवड, रावेर, मुक्ताईनगर तालुक्यातील समाज घटकांनी ॲड.रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना विजयी करण्याचे पत्रकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.

सोमवारी ॲड.रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार साहेब यांची मुक्ताईनगर येथे प्रचार सभा संपन्न झाली यावेळी सभेच्या व्यासपीठावर मराठा सेवा संघाचे स्थानिक पदाधिकारी दिपकराज पाटील, धीरज पाटील, अमोल पाटील, चेतन पाटील, भूषण पाटील, निलेश बेलदार, अजय पाटील यांनी ॲड.रोहिणी खडसे यांना मराठा सेवा संघाचा जाहीर पाठिंबा दर्शवत पाठिंब्याचे पत्र सुपुर्द केले.

सदर पत्रकात नमुद करण्यात आले आहे की, मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांचा शैक्षणिक, व्यावसायिक, शेती विषयक व नोकरी क्षेत्रात तसेच आरोग्य या बाबी लक्षात घेता समाजाचा सर्वांगिण विकास व्हावा या दृष्टीकोनातून महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड. रोहिणी एकनाथराव खडसे यांना अखिल भारतीय मराठा महासंघ मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुक्यातर्फे जाहिर पाठिंबा दर्शवत आहोत. जाहिर पाठिंबा दर्शविल्याबद्दल ॲड. रोहिणी खडसे यांनी अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे आभार व्यक्त करून, सदोदित समाजातील आर्थिक दुर्बल घटकांच्या, तरुणांच्या उन्नतीसाठी आणि समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील असे पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.