⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 6, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | मंगळग्रह मंदिरात अनुभवली अलौकिक मनः शांती – डॉ. के.जे.श्रीनिवासा

मंगळग्रह मंदिरात अनुभवली अलौकिक मनः शांती – डॉ. के.जे.श्रीनिवासा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २० जानेवारी २०२३ | अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात पहाटे श्रीनित्यप्रभात मंगलाभिषेक केल्यानंतर मनाला अलौकिक मनःशांती लाभली असून मन प्रसन्न झाले आहे .मंदिरात स्वच्छ , सुंदर व प्रसन्न वातावरणात सकारात्मक उर्जेची अनुभूती मिळाली . मी जरी अधिकारी असलो तरी धर्म व अध्यात्मावर माझी श्रद्धा आहे , असे प्रतिपादन वेस्टइंडीज येथील भारतीय राजदूत डॉ. के.जे.श्रीनिवासा यांनी केले. (Dr K J Shrinivasa in jalgaon)
अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात १६ रोजी वेस्टइंडीज येथील भारतीय राजदूत डॉ.के.जे.श्रीनिवासा यांनी भेट दिली. पहाटेच्या महापुजेनंतर येथील संतश्री प्रसाद महाराज अभिषेकगृहात त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.


डॉ. श्रीनिवासा म्हणाले की, मी कर्नाटकातील दुर्गम भागातील मध्यमवर्गीय असल्याने स्पर्धा परीक्षेसाठी कोणताही क्लास लावला नाही.मात्र प्रचंड अभ्यास केला.त्यामुळेच देशात पहिला आलो .
वेस्ट इंडीज व भारत संबंध , भारताचे परोपकारी व सहिष्णू धोरण , नूतन पासपोर्ट धोरणातील त्यांचे चिरस्मरणीय योगदान , आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचे रंजक किस्सेही डॉ. श्रीनिवासा यांनी सांगितले . भोंग्यासाठीच्या टॉवरच्या जागेचे भूमिपूजनही त्यांनी केले. अनेक मान्यवरांनी त्यांचे स्वागत व सन्मान केला .
यावेळी माजी आमदार स्मिता वाघ,पोलिस ऊपअधिक्षक राकेश जाधव, पोलिस निरीक्षक विजय शिंदे, मनिषा शिंदे,खा.शि.मंडळाचे चेअरमन हरी भिका वाणी, संचालक प्रदीप अग्रवाल, लायन्स क्लबचे अध्यक्ष योगेश मुंदडा, खजिनदार अनिल रायसोनी ,लिओ क्लबचे अध्यक्ष हरिओम अग्रवाल, सरकारी वकील शशिकांत पाटील व राजेंद्र चौधरी , भाजपचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील ,खा. शि.मंडळाचे माजी चेअरमन डॉ. किशोर शाह , जेष्ठ सुवर्णलंकार व्यापारी मदनलाल सराफ , अर्बन बँकेचे संचालक पंकज मुंदडे, निवृत्त प्राचार्य डॉ. एस . आर . चौधरी , सामाजिक कार्यकर्ते विनोद अग्रवाल, प्रदीप जैन ,श्यामलाल गोकलाणी,राजू नांढा , दिलीप गांधी, रवी पाटील,रमेश महाजन,नरेंद्र निकुंभ, कुमारपाल कोठारी,राजेंद्र निकुंभ , आशिष चौधरी, विशाल शर्मा ,मनीष जोशी,ललित सौंडागर डॉ.महेश पाटील, दिपक पाटील( वावडे),सेवा संस्थेचे अध्यक्ष डिंगबर महाले ,उपाध्यक्ष येस. एन. पाटील ,सचिव येस.बी. बाविस्कर,खजिनदार गिरीश कुलकर्णी , सहसचिव दिलीप बहिरम , विश्वस्थ अनिल अहिरराव संस्थेचे ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, कंस्ट्रकशन कन्सल्टंट संजय पाटील व अनेक मान्यवर उपस्थित होते .

author avatar
टीम जळगाव लाईव्ह