परप्रांतिय तरुण मजूराची आत्महत्या ; तिघ्रे शिवारातील घटना

एप्रिल 19, 2021 12:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२१ । रस्त्याच्या कामासाठी आलेल्या परप्रांतिय तरुण मजूराने शेतातील निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आलीय. संतोष रॉय भिम रॉय (वय-२३ रा.रा. दोंदिया, झारखंड) असे गळफास घेतलेल्या मजुराचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

crime

याबाबत असे की, जळगाव खुर्द व तिघ्रे शिवारातील रस्त्याच्या कामासाठी झारखंड राज्यातील दोंदिया,जि. जरमुण्डी दुमका येथील संतोष रॉय हा कामासाठी आला आहे. मागील गेल्या तीन महिन्यापासून तो येथे काम करती आहे. तो सध्या तिघ्रे ता.जि.जळगाव येथे भाड्याने राहत होता. दरम्यान,काल रविवारी सोबत काम करणाऱ्या मजूरांसह त्याने रात्री जेवण केले व झोपून गेले. दरम्यान आज सोमवार १९ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास तिघ्रे शिवारातील शेनफडू पुंडलिक पाटील यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला रूमालाच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. 

तातडीने त्याला गोदावरील रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि गणेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. रविंद्र इंधाटे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now