Suicide : आत्महत्या
जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । स्वतःची दुचाकी रेल्वे रूळावर लावून ३५ वर्षीय तरूणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. किरण पांडूरंग मिस्तरी (वय-३५) रा. व्यंकटेश नगर, हरीविठ्ठल नगर, जळगाव असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.
हरीविठ्ठल नगरात राहणारा किरण मिस्तरी हा आपल्या आईवडील, पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. फर्निचरचे काम करून आपला आपला उदरनिर्वाह करतो. रविवारी १७ एप्रिल रोजी त्यांच्या साल्याचे लग्न असल्याने पत्नी मुलांसह माहेरी गेल्या होत्या. लग्न आटोपून पुन्हा किरण मिस्तरी हा जळगावी राहत्या घरी आला होता. रेल्वे रूळावरील डाऊन लाईनवरील रेल्वे खंबा क्रमांक ४१४ च्या ३-५ दरम्यान धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पो.कॉ. लिलाधर महाजन करीत आहे.