---Advertisement---
बोदवड

Suicide : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लिपिकाची गळफास घेत आत्महत्या

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२२ । बोदवड शहरातील सहकार नगरातील रहिवासी तथा जामनेर येथे सार्वजनिक बांधकाम विभागात लिपिक असलेले विनोद रघुनाथ गोसावी यांनी राहते गाव मुक्तळ (ता.बोदवड) येथील वन विभाग हद्दीत भणकोबाबा मंदिर परिसरात झाडाला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.

suicide 4 jpg webp

अधिक माहिती अशी की, गोसावी हे २९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेपासून जामनेर येथे नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी घरून निघाले होते. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी परत आले नाहीत. यामुळे कुटुंबीय व नातेवाइकांनी सर्वत्र शोधाशोध केली. तरीही ते कोठेही आढळले नाहीत. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास गोसावी यांचे मूळ गाव असलेल्या मुक्तळ येथून सुरेश शेळके यांनी गोसावी यांच्या मुलाला संपर्क साधला. त्यांच्या आत्महत्येची माहिती दिली. दरम्यान, शुभम विनोद गोसावी याच्या खबरीवरून बोदवडला अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तपास पोलिस नाईक संदीप वानखेडे करत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---