भाऊबीजच्या दिवशीच पती-पत्नीने उचललं टोकाचे पाऊल; गावात एकच खळबळ

नोव्हेंबर 4, 2024 2:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२४ । रावेर तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. भाऊबीज सणाच्या दिवशीच पती- पत्नीने घरातच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना विवरे खुर्द येथे उघडकीस आली आहे. अनिल देविदास हरणकार (वय ३८) व पत्नी शितल अनिल हरणकार (वय ३२) असं आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव असून या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून पती- पत्नीने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणाने उचलले याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Vivre

रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येथील कुंभार वाड्यात अनिल देविदास हरणकार व त्याची पत्नी शितल अनिल हरणकार हे दोन मुले व एक मुलीसह वास्तव्यास होते. दीपावली उत्सव साजरा केल्यानंतर दोघांनी भाऊबीजच्या दिवशी (३ नोव्हेंबर) दुपारी दिड वाजेच्या सुमारास घरातच कपड्याच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गावात घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

यानंतर निंभोरा पोलिस स्टेशनचे सह पोलिस निरिक्षक हरीदास बोचरे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला. निंभोरा पोलिसात धनश्याम हरणकार (रा. विवरे खुर्द) यांनी दिलेल्या फिर्यारीवरून मुत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. पती- पत्नीच्या आत्महत्यांमुळे दोन मुले व एक मुलगी अनाथ झाले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now