वरणगाव आयुध निर्माणी वसाहतीमधील तरुणाची आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२१ । वरणगाव आयुध निर्माणी वसाहत मधील एका २६ वर्षीय तरुणाने राहत्या घराच्या गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवार दि २५ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. सागर दिनकर सुरवाडे (२६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकले नाही.

याबाबत वरणगाव पोलीसानी दिलेल्या माहीतीनुसार असे की, आयुध निर्माणी वसाहत मधील क्वाटर न १२ सी टाईप २ मध्ये रहिवास करीत असलेला सागर सुरवाडे  याने रविवार दि २५ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील छताच्या हुकाला दोरीच्या सहयाने गळफास लावुन आत्महत्या केली. 

या बाबत वरणगाव पोलीसात सुकलाल दिनकर सुरवाडे यांच्या खबरीनुसार अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  घटनेचा पुढील तपास सह फौजदार नरसिंग चव्हान करीत आहे.