गळफास घेऊन चिंचोलीतील तरुणाची आत्महत्या

ऑगस्ट 4, 2021 1:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२१ । जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील ३५ वर्षीय तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्री उघडकीस आली. गणेश शिवाजी गोसावी (वय-३५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime jpg webp

याबाबत असे कि, गणेश गोसावी हा पत्नी व दोन मुलांसह चिंचोली येथे वास्तव्याला असून ते हातमजुरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, काल मंगळवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास  त्यांनी राहत्या घरात साडीने गळफास घेतले. ही बाब त्यांची ५ वर्षाची मुलगी परी हिच्या लक्षात आल्याने घटना उघडकीला आली. नातेवाईकांनी तातडीने त्यांना खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.

आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक रतिलाल पवार करीत आहे. मयताच्या पश्चात आई मंगलाबाई, वडील शिवाजी प्रल्हाद गोसावी, पिंटू व सोनू हे दोन भाऊ, पत्नी गुड्डी, मुलगी परी आणि ४ वर्षाचा मुलगा सोम असा परिवार आहे.

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now