---Advertisement---
गुन्हे पारोळा

तमाशा मंडळातील तरुण-तरुणीने घेतले विष, दोघांचा मृत्यू

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२२ । तमाशा मंडळातील तरुणी व तरुणाने विषारी प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पारोळा शहरात घडली. अंजली अशोक नामदास (वय २०, रा. दत्त कॉलनी, भुसावळ) व योगेश उर्फ सुनील नामदेव बोरसे (वय १९, रा. अंजाळे, ता. यावल) असे आत्महत्या केलेल्या दोघांची नावे असून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.

parola news jpg webp

काय नेमकी घटना?
भिका-नामा तमाशा मंडळ हे धुळे जिल्ह्यातील बाबुळवाडी येथून येथे दि. २४ रोजी दुपारी तमाशाचे काम आटोपून दुसऱ्या ठिकाणी जात होते. पण पारोळा शहरातील कजगाव रोडवरील पेट्रोल पंपाजवळ वाहन नादुरुस्त झाल्याने थांबले होते. तमाशा मंडळातील तरुणी अंजली अशोक नामदास व योगेश उर्फ सुनील नामदेव बोरसे हे दोन्ही तमाशा मंडळातच काम करतात.

---Advertisement---

दोघे बाजारात जाऊन येतो, असे सांगून निघून गेले. ते लवकर न आल्याने मंडळातील अन्य सहकाऱ्यांनी शोध घेतला. तेव्हा ते बाजारात होते. त्यावेळी त्यांना विचारपूस केली असता एवढा वेळ का लागला? त्यांनी सांगितले की आम्ही दोघांनी काहीतरी विषारी औषध सेवन केला आहे, असे सांगितले.

दरम्यान, दोघांना सहकाऱ्यांनी लगेच एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर २५ रोजी पुढील उपचारार्थ पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. तेव्हा अंजलीची प्राणज्योत दुपारी दोनला मालवली, तर योगेशचा सायंकाळी सहाला मृत्यू झाला. याबाबत दोघांच्या नातेवाईकांनी पारोळा पोलिसात खबर दिली. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---