जळगावात विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

जुलै 31, 2024 5:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२४ । जळगावातील आव्हाणे शिवारात विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. राणी श्यामकांत देशमुख (वय ४४) असे मृत विवाहितेचे नाव असून विवाहितेच्या आत्महत्येचे कारण कळाले नाही. याबाबत तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.

Rani Deshmukh jpg webp

याबाबत असे की, राणी देशमुख कुटुंबासह ओमसाईनगरात वास्तव्यास होती. देशमुख हे मुळ अडावद येथील रहिवासी आहेत. ते येथे एका कंपनीत कंपनीत कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे राणी यांचे पती दि. ३० जुलै रोजी कामानिमित्त घराबाहेर गेले. दुपारी विवाहितेने घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.

संध्याकाळी पती घरी आल्यानंतर त्यांना दरवाजा बंद दिसला. त्यांनी आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता घटना समोर आली.तत्काळ त्यांनी खबर तालुका पोलिस ठाण्यात दिली. माहिती कळताच पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्यासह कर्मचारी रामकृष्ण इंगळे, अनिल फेगडे, अनिल मोरे यांनी धाव घेतली. विवाहितेचा मृतदेह उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. घटना कळताच मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now