जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

डिसेंबर 12, 2021 3:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२१ । जिल्ह्यात आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अशात आज जळगावातील एका ३३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सुधीर नाना साळुंखे (वय-३३) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून आत्महत्येमागील कारण अद्यापही कळू शकले नाहीय. याबबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime jpg webp

याबबत असे की, शहरातील समता नगरात राहणारा सुधीर साळुंखे हा तरूण आईवडील, पत्नी व भाऊ सोबत राहतो. नोकरीनिमित्त तो सुरत येथे वास्तव्याला होते. परंतु  कोरोनामुळे कामाकाज बंद झाल्यानंतर ते पत्नीसह जळगावला आले होते. सध्या ते नोकरीच्या शोधात होते. शनिवारी ११ डिसेंबर रोजी रात्री कुटुंबियांसह जेवण करून सर्वजण झोपले होते. मध्यरात्री सर्वजण झोपलेले असतांना सुधीर साळुंखे यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे सकाळी उघडकीला आले.

आत्महत्या केल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश केला होता. घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अतुल चौधरी करीत आहे. मयत सुधीरच्या पश्चात आई मालूबाई, वडील नाना साळुंखे, भाऊ मुकेश, पत्नी मोनाली, मुलगी पुर्वा आणि दीड वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now