जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२२ । जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील ३३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. गिरीष प्रकाश पाटील (वय-३३) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, शिरसोली येथील ३३ वर्षीय गिरीष पाटील यांनी आत्महत्या केली. ते गेल्या १३ वर्षांपासून ते बांभोरी येथील जैन कंपनीत कामाला आहे. गुरूवारी २७ जानेवारी रोजी रात्री त्याने कुटुंबियासह जेवण करून झोपले. मध्यरात्री सर्वजण झोपलेले असतांना मागच्या खोलीत गिरीष पाटील याने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.

आज सकाळी त्यांची पत्नी रेणूका ह्या झोपेतून उठल्या त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. यावेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला होता. नातेवाईकांनी तातडीने त्यांना खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात आई सुनंदाबाई, वडील प्रकाश पाटील, भाऊ सतिष आणि पत्नी रेणूका असा परिवार आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
हे देखील वाचा :
- गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये गणेशोत्सव स्पर्धांतून संस्कृतीचा जागर
- सराफा बाजारात शनिवारी मोठी तेजी! सोने-चांदीत तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ?
- जळगाव रेल्वे स्थानकावरील कामाचा फटका; १२ गाड्या रद्द, अनेकांच्या वेळेत बदल
- मुंबईत लालबागच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या तरुण अभियंत्याचा मृत्यू
- बांभोरी पुलावरून महिलेने घेतली गिरणा नदीत उडी; शोधमोहीम सुरू !










