जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२४ । नुकताच Hangama OTT वरती प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट ‘ते १० दिवस’ संवेदनशील विषयांमुळे लोक मनात घर करत आहे. या चित्रपटांमध्ये गणपतीच्या अतिशय आनंदी अशा दहा दिवसात काही अनिष्ट प्रथामुळे समाजावर काय परिणाम होतो याचे मार्मिक चित्रण करण्यात आले आहे.
या चित्रपटाचा प्रीमियर शो डॉ. केतकी यांच्या वाढदिवसानिमित्त नुकताच गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज,जळगाव येथे पार पडला. या चित्रपटामध्ये गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या 13 विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकारीतेची चुणूक दाखवली आहे. हा सर्वत्र चर्चेचा विषय आहे. यामुळे गोदावरी इंग्लिश स्कूल मधून चांगल्या कलाकारांना आणि समाज उपयोगी बाबींना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते ,याचे हे मूर्तिमंत उदाहरण समाजासमोर आले आहे.
यात गोदावरी इंग्लिश स्कूलचे मुख्य कलाकार रुद्र म्हसकर,समर्थ थोरात,साधना ठाकूर, मोहित पाटील,साहिल रडे,राज पाटील, स्वरीत घुगे, आदित्य गोडसे, रुद्र बोरोले, मोहित पाटील,भागेश पाटील,रितेश पाटील,योगीराज पाटील यात मुख्य भूमिकेत रुद्र म्हसकर आणि समर्थ थोरात यांनी भूमिका बजावली. या त्यांच्या लौकिक कार्यामुळे प्रीमियर शो मध्ये गोदावरी समूहाचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हासजी पाटील यांनी त्यांच्याशी मनमूराद चर्चाही केली.डॉ.वर्षा पाटील ,डॉ. वैभव सर यांच्यासह आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
या चित्रपटाचे ग्रामविकास मंत्री मा.ना. गिरीश भाऊ महाजन व डॉ.उल्हास पाटील सर यांच्या हस्ते पोस्टर लॉन्चिंगही नुकतेच करण्यात आले, या चित्रपटांमध्ये जी घटना दाखविण्यात आली आहे. ती नांदेड जिल्ह्यातील एका गावातील घटनेशी प्रेरित असून,याची दखल घेत नांदेड चे पालकमंत्री मा.ना.गिरीश भाऊ महाजन यांनी पोस्टरचे लॉन्चिंग केले आणि सर्वांनी हा चित्रपट पाहावा असे आव्हाने केले आहे.
गोदावरी इंग्लिश स्कूलच्या प्रिन्सिपल सौ.नीलिमा चौधरी यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या या लोकहित कार्याला पाठबळ दिले असून या चित्रपटाचा विषय सर्व समाजाच्या तळागाळापर्यंत जावा आणि लोकजागृती व्हावी असे आव्हान केले आहे. या चित्रपटाची निर्मिती राघव फिल्म प्रोडक्शन यांच्याकडून झाली आहे तर या चित्रपटात सहाय्यक निर्माता म्हणून बंधन प्रोडक्शन यांनी कार्य केले आहे. या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन भारत वाळके यांनी केले तर चित्रण आणि संकलनाचे काम योगेश ठाकूर, संगीत दिग्दर्शन उदय सूर्यवंशी, गीतकार आणि गायक अण्णा सुरवाडे आणि मंगेश जोशी यांनी केले आहे.यात जळगाव शहरातील कलाकारांनी काम केले असून,महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम हेमंत पाटील यांची मुख्य भूमिका आहे.