विद्यार्थिनी स्नेहा भोई ९८.४०% गुणांसह प्रथम
जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात समर्पण संस्था संचलित शारदाश्रम व सुभद्रा लक्ष्मण चौधरी विद्यालयाने आपल्या १०० टक्के यशाची परंपरा कायम राखत निकाल नोंदवला आहे.

शाळेच्या घवघवीत यशाचे वैशिष्ट्य म्हणजे परीक्षेस बसलेले सर्व ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये विशेष श्रेणीत २३ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत १७ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत ०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

शाळेची विद्यार्थिनी कु. स्नेहा भोई हिने ९८.४०% गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे, स्नेहाने कोणतेही खाजगी ट्यूशन न लावता केवळ शाळेतील मार्गदर्शन आणि स्वतःच्या अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.

तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे







