जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२२ । भुसावळ शहरातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात 15 ऑक्टोबर हा दिवस डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. प्रास्ताविक प्रा.ज्योती ओस्तवाल यांनी केले. प्राचार्य डॉ. रमेश जोशी यांच्याहस्ते डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी काव्य गद्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत प्रणिता सुरडकर, मेहविश शेख, मुस्कान गौर, हमजा शेख, कशिश इदा, श्वेता लोदी, विकास पंडित, दिनेश गायकवाड आदींनी सहभाग नोंदवला.

नियमित वाचन गरजेचे

डॉ.रमेश जोशी यांनी विद्यार्थ्यांनी आपली वाचन क्षमता वाढवावी ,यसाठी नियमित वाचन व लेखन करायला हवे, असे आवाहन केले. परीक्षक म्हणून डॉ.सुधीर शर्मा, डॉ.विवेक जोशी यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा.ज्योती ओस्तवाल तर आभार डॉ.पूनम त्रिवेदी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.पूनम त्रिवेदी व प्रा.ज्योती ओस्तवाल यांनी परीश्रम घेतले.








