जळगाव शिवसेनेत जोरदार इनकमिंग : उद्धव ठाकरेंच्या हस्ते झाला प्रवेश

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ ।  सोमवारी मुंबई येथील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवास्थान असलेल्या मातोश्री बंगल्यावर. जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी समवेत नवीन पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेत शिवबंधन बांधुन प्रवेश केला.

यात रमेश माणिक पाटील विधानसभा शेत्र्प्र्मुख् राष्ट्रवादी, उमेश रावसाहेब पाटील जिल्हा सरचिटणीस युवक राष्ट्रवादी, प्रवीण कौतिक पाटील, छोटू सुकदेव पाटील
शेतकरी नेते, भाऊसाहेब सुकदेव सोनवणे, जिल्हा अध्यक्ष कोळी सेल कॉग्रेस, ,डॉ .जुबेर खान, प्रहार जिल्हा नेते, चेतन पुंडलिक सोनवणे, ग्राम पंचायत सदस्य भोकर, याचा समावेश होता.

यावेळी संजय सावंत जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख, शरद तायडे महानगर प्रमुख जळगाव, विष्णू भंगाळे जिल्हा प्रमुख जळगाव, महानंदा पाटील, महिला आघाडी जिल्हा प्रमुख जळगाव, उपमहापौर कुलभूषण पाटील,विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, निलेश चौधरी युवा सेना जिल्हाप्रमुख, अँड शरद माळी उपजिल्हा प्रमुख, राजेंद्र ठाकरे उपजिल्हा संघटक इ.उपस्थित होते.