हतनूर धरणाचे १० दरवाजे उघडले, तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जुलै 4, 2026 12:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२६ । जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. यामुळे हतनूरचे ८ दरवाजे उघडण्यात आले असून, तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाहूया या संदर्भातील सविस्तर वृत्त…”

hatnur damj

विदर्भ आणि मध्य प्रदेशात होत असलेल्या सततच्या पावसामुळे हातनूर धरणाची पाणीपातळी आज सकाळी ८ वाजेपर्यंत २१२.१०० मीटरवर पोहोचली आहे. सध्या धरणात एकूण ७३ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध असून, गेल्या २४ तासांत धरण परिसरात २८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात पाण्याची आवक सातत्याने वाढत असल्याने, प्रशासनाने धरणाचे १० दरवाजे १ मीटरने उघडले असून, तब्बल २२ हजार २४८ क्युसेक्स वेगाने तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. यासोबतच कालव्यातूनही ३०० क्युसेक्स पाणी सोडले जात आहे.

धरणातून होणारा हा मोठा विसर्ग लक्षात घेता, प्रशासनाने तापी नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन केले आहे. तसेच, नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांनी आपली जनावरे आणि शेतीचे साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असा इशारा देण्यात आला आहे.”

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now