जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२२ । आतापर्यंत आपण पूर्वीच्या वादातून मारहाण व शिवीगाळ करण्यात आल्याचे वृत्त वाचले असेल. मात्र, मुक्ताईनगरत चक्क पूर्वीच्या वादातून दोन्ही पायावर ट्रॅक्टर चालविल्याची धक्कादाक घटना घडली आहे. या प्रकरणी ९ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप रामदास पवार (वय ५२, निमखेडी खुर्द, मुक्ताईनगर) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पवार हे दि.२६ ऑगस्ट रोजी त्यांच्या घरासमोर ओट्यावर बसले असता संशयित आरोपी योगेश व्यवहारे हा त्याच्या वाड्यातील ट्रॅक्टर घेऊन जात असताना फिर्यादीने त्यास सांगितले की, पुढे जाण्यास जागा नाही तू ट्रॅक्टर घेऊन जाऊ नकोस असे बोलल्याने आरोपी याने पूर्वीच्या वादाच्या कारणावरून फिर्यादीच्या दोनी पायावर ट्रॅक्टर चालविले व जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

तर संशयित आरोपी दिलीप व्यवहारे याने त्याच्या हातातील काठीने फिर्यादीस उजव्या हातावर व पाठीवर मारहाण केली. तसेच त्यांच्यासोबतच्या सात-आठ जणांनी शिवीगाळ केली. या प्रकरणी पवार दि.२६ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार सदर आरोपींविरूद गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संजीव पाटील करत आहेत.










