⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

मोठी बातमी : राज्यात उद्यापासून १५ दिवसांसाठी कडक निर्बंध; जाणून घ्या सविस्तर

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२१ । महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात १५ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. उद्या दिनांक १४ एप्रिलपासून हे कडक निर्बंध लागू होणार आहेत. राज्यात संपूर्ण कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

राज्यात रुग्णसंख्येसोबतच मृतांचा आकडा देखील वाढत असल्याने सरकार समोरील चिंता वाढत आहे. त्यासोबतच राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या आरोग्य सुविधांची कमतरता देखील जाणवू लागल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन करायला हवा, असा देखील दावा केला गेला. लॉकडाऊन बाबत सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया आल्या. यामध्ये काहींनी लॉकडाऊनचं समर्थन केलं तर काहींनी विरोध केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात सर्वपक्षीय नेते, डॉक्टर, मनोरंजन क्षेत्रातील प्रतिनिधी, तज्ज्ञांशी चर्चा देखील केली. या सर्व चर्चांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज राज्यातल्या जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला.

काय सुरु राहील काय बंद राहील?

  • सर्व आस्थापना, इतर सेवा बंद राहतील
  • लोकल रेल्वे, बस सेवा बंद राहणार नाही पण त्या अत्यावश्यक सेवेसाठी वापरण्यात येतील
  • अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते रात्री ८ सुरू
  • बँक सेवा सुरू राहणार
  • कामगारांच्या राहण्याची व्यवस्था असलेली बांधकामे सुरू राहणार
  • पेट्रोल पंप सुरू राहणार
  • हॉटेलला पार्सल सुविधा देण्यास परवानगी; कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी आवश्यक
  • रुग्णालय, औषधी दुकाने, लस उत्पादक, पाणी वाहतूक, वैद्यकीय कच्चा माल, जनावर संबंधित दुकाने, शीतगृहे, रेल्वे , बस, ऑटो, दूरसंचार, इ कॉमर्स,पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू राहील.

काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

  • गोरगरिबांना ३ गहू आणि २ किलो तांदळ एक महिना मोफत मिळनार
  • शिवभोजन मोफत देणार
  • ३५ लाख लाभार्थ्यांना १,००० थेट मदत
  • कोविडसाठी ३ हजार ३०० कोटींची तरतूद
  • आरोग्यासाठी ५ हजार ४०० कोटींची तरतूद
  • आदिवासी कुटुंबांना २ हजारांची मदत