मेहरूण परिसरातील गल्ल्यांना शबरी मातेचे नाव द्यावे !
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । महासभेच्या पटलावर मेहरूण परिसरातील गल्ल्यांना लेक सिटी लेन असे नाव देण्यात यावी असा प्रशासकीय प्रस्ताव आला होता. नागरिकांनी याबाबत मागणी केल्यामुळे हा प्रस्ताव महासभेच्या पटलावर आला होता.
मात्र मेहरूणची बोर ही विख्यात आहेत. याचं बरोबर बोरांचा उल्लेख रामायणात आहे. शबरी मातेचे उष्टे बोर प्रभू श्रीरामांनी खाल्ले होते. यामुळे मेहरून लेक सिटी लेन असे नाव देण्या व्यातीरिक्त शबरी मातेचे नाव या ठिकाणी देण्यात यावी अशी मागणी भाजपा नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी केली.
यावेळी बोलताना भाजपा नगरसेवक विशाल त्रिपाठी म्हणाले की, मेहरूण या भागाची बोरं खूप प्रसिद्ध आहेत. या बोरांचा आणि रामायणाचा देखील संदर्भ आहे. प्रभू श्रीरामांनी शबरी मातेची उष्टी बोरं खाल्ली होती. रामायणाचा आणि बोरांचा संदर्भ टिकवत. आपण लेक सिटी लेन व्यतिरिक्त शबरी मातेचा उल्लेख असणारं नाव या ठिकाणी घेतलं पाहिजे.
यावर महापौर जयश्री महाजन आणि सांगितले की, तुमचं म्हणणं बरोबर आहे. मात्र लेक सिटी लेनची मागणी नागरिकांची आहे. यामुळे आपण सध्या हा प्रस्ताव तहकूब ठेवूया आणि हा प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आला.