वादळी पावसाचा जळगाव जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणेला वादळाचा मोठा फटका

जून 12, 2025 4:59 PM

वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी वेगात काम सुरु

Mahavitaran Bharti jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण यंत्रणेला मोठा फटका बसला असून महावितरणच्या अधोसंरचनेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

वादळामुळे एकूण १५ उपकेंद्रांची वीज सेवा तात्पुरती खंडित करण्यात आली होती. महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू ठेवत त्यापैकी ५ उपकेंद्रांची सेवा पूर्ववत केली आहे. उर्वरित १० उपकेंद्रांची वीज सेवा दुपारी ४ वाजेपर्यंत पूर्ववत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

महावितरणच्या विविध विभागांतील पथके सलग दिवसरात्र काम करत आहेत. वीज खांब, ट्रान्सफॉर्मर आणि अन्य आवश्यक साहित्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. इतर भागांतून अतिरिक्त कर्मचारी व तांत्रिक पथकेही जिल्ह्यात दाखल झाली आहेत.

महावितरणने स्पष्ट केले आहे की, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत असून कोणताही धोका पत्करण्यात येणार नाही. नागरिकांनी सहकार्य करून कोणत्याही तुटलेल्या वा धोकादायक वीज संरचनेपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment