जिल्ह्यात वादळाचा तडाखा : कापूस, मका, केळी पिकांचे नुकसान
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे. यामुळे कित्येक तालुक्यांना याचा फटका बसला आहे. यामुळे कापूस. मका. डाळिंब. केळी यासह कित्येक पीक जमिनीवर आडवी पडली आहेत. पर्यायी शेतकऱ्यांचा हाता तांडाचा घास हिरावून गेला आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांनी रात्रंदिवस जागून कष्टाने आपली शेती फुलवली. महिनाभरापासून पावसाने दांडी मारली होती. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते की काय असे वाटत होते. तरीदेखील शेतकऱ्याने आपली पिकं वाचवली. मात्र आठवड्याभरात आलेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची पिक आडवी झाली आहेत. यामुळे कपाशी मका केळी सह बागायती डाळिंब फळ पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
याबाबत सरकारी दौरेही सुरू झाले असून लवकरच शासन मदतीची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे. मात्र अंदाजे 60 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे असे म्हटले जात आहे.